About sanstha

Posted on

About sanstha

महासाधू मोरया गोसावी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या चिंचवड भूमीमध्ये तसेच अनेक साधू-साध्वी, तपस्वी यांच्या वास्तव्याने पुनीत झालेली श्री जैन विद्या प्रसारक मंडळ ही संस्था पिंपरी-चिंचवड परिसरातील गरीब व कामगार वर्गातील विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यपूर्व काळापासून शिक्षण देण्याचे काम करत आहे. 8 सप्टेंबर 1927 साली श्री जैन विद्या प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना परमपूज्य प्रेमराजजी मसा हे चातुर्मासाचा निमित्त चिंचवडला वास्तव्यास असताना झाली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच संस्कारक्षम विद्यार्थी घडविण्याबरोबरच शिक्षणाचा दर्जा सतत उंचावण्यासाठी संस्थेचे माजी ऑनररी जनरल सेक्रेटरी स्वर्गीय ऋषितुल्य, पितृतुल्य व्यक्तिमत्व श्री शंकरलालजी जोगिदासजी मुथा यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष व कार्याध्यक्ष स्वर्गीय दानशूर व्यक्तिमत्व श्री रसिकलालजी माणिकचंदजी धारीवाल व त्यांना मदत करणारे संस्थेचे सर्व पदाधिकारी यामुळे संस्थेची उत्तरोत्तर प्रगती होत चालली आहे.

संस्थेचे विद्यमान अध्यक्ष श्रीमान प्रकाशकुमारजी धारिवाल, कार्याध्यक्ष श्रीमान शांतीलालची लुंकड, मानद सचिव ॲडहोकेट श्रीमान राजेंद्रकुमारजी मुथा, सहाय्यक सेक्रेटरी श्रीमान अनिलकुमारजी कांकरिया व श्रीमान राजेशकुमारजी साकला, कोषाध्यक्ष श्रीमान प्रकाशचंदजी चोपडा यांच्या बहुमोल मार्गदर्शनामुळे संस्थेचे प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व व्यवसायिक असे वेगवेगळे पस्तीस विभाग दर्जेदार शिक्षण देत आहेत.

संचालक डेस्क – श्री. जैन विद्या प्रसारक मंडळ चिंचवड

fattechandjain
Author